How to Fix Ladaki Bahin Yojana E-Kyc Error Online (लाडकी बहीण योजना ई-केवायसी समस्या सोडवण्याचे संपूर्ण मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) ही महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. दरमहा ₹1500 थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांनी E-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.
परंतु अनेक वेळा महिलांना ही ई-केवायसी करताना तांत्रिक व माहितीविषयक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे Ladaki Bahin Yojana E-Kyc Error खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे दिसतो.

लाडकी बहिण योजना ई-केवायसी 2025 –आजपर्यंतची माहिती
क्रमांक | माहिती | तपशील (2025 पर्यंत) |
---|---|---|
1 | योजना सुरू झाल्याची तारीख | 1 जुलै 2024 पासून अर्ज सुरू |
2 | लाभार्थी वर्ग | महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित / घटस्फोटित / विधवा महिला |
3 | लाभ रक्कम | दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात |
4 | अर्ज प्रक्रिया | Online Portal व CSC सेंटर मार्फत |
5 | ई-केवायसी पद्धती | OTP |
6 | आजपर्यंत पोर्टल वर नोंदणी झालेल्या महिला शासनाच्या अधिकृत वेबसाइट नुसार | 1,12,70,261 |
7 | आजपर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिला | अंदाजे 50 लाख |
8 | प्रलंबित ई-केवायसी (Pending) | अंदाजे माहिती सांगता येणार नाही |
9 | सर्वाधिक समस्या येणारे Errors | Aadhaar Authentication Failed, Server Down, Mobile Number Not Linked, Fingerprint Mismatch |
10 | सरकारकडून उपाययोजना | अतिरिक्त CSC सेंटर सुरु, हेल्पलाइन नंबर सुरू (1800-120-8040), तांत्रिक पोर्टल सुधारणा |
11 | पुढील टप्पा | प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करणे आणि ऑक्टोबर 2025 पासून नियमित लाभ वाटप |
या लेखामध्ये आपण पाहणार आहोत –
- ई-केवायसी म्हणजे काय
- सर्वसामान्य समस्या (Errors)
- प्रत्येक समस्येचे उपाय
- स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- महत्वाच्या सूचना
Ladaki Bahin Yojana E-Kyc Error म्हणजे काय?
E-KYC (Electronic Know Your Customer) ही एक ऑनलाइन पडताळणी प्रक्रिया आहे. यामध्ये आधार क्रमांक वापरून शासनातर्फे लाभार्थ्याची माहिती पडताळली जाते.
या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींना आपण Ladaki Bahin Yojana E-Kyc Error म्हणतो.
उदा. –
- Server Down Error
- Aadhaar Authentication Failed
- Mobile Number Not Linked to Aadhaar
- Fingerprint Mismatch
- Pending for Verification
Ladaki Bahin Yojana E-Kyc करताना येणाऱ्या सामान्य समस्या
क्रमांक | समस्या (Error) | कारण |
---|---|---|
1 | Aadhaar Authentication Failed | आधारवरील OTP किंवा बायोमेट्रिक जुळत नाही |
2 | Server Error / Technical Error | पोर्टल सर्व्हर डाऊन असणे |
3 | Mobile Number Not Linked | आधारशी मोबाईल नंबर लिंक नाही |
4 | Fingerprint Not Match | बोटाचे स्कॅन न होणे |
5 | Name Mismatch | अर्ज व आधार नाव वेगळे |
6 | DOB Mismatch | जन्मतारीख न जुळणे |
7 | Document Upload Error | चुकीच्या फॉरमॅटमुळे अपलोड न होणे |
8 | Pending for Verification | ई-केवायसी सबमिट झाल्यानंतरही प्रक्रिया अडकणे |
9 | Invalid Captcha Error | चुकीचा कॅप्चा भरल्याने |
10 | Bank Account Not Linked | आधार-बँक खाते लिंक नसणे |
Ladaki Bahin Yojana E-Kyc Error सोडवण्यासाठी उपाय
1. Aadhaar Authentication Failed
- आधारवरील मोबाईल नंबर लिंक करा.
- UIDAI केंद्रात बायोमेट्रिक अपडेट करा.
- OTP योग्यरीत्या भरा.
2. Server Error / Technical Error
- सकाळी 4 ते 7 वा. किंवा रात्री 12 च्या नंतर प्रयत्न करा.
- Chrome/Edge वापरून पहा.
- Cache आणि Cookies Delete करा.
3. Mobile Number Not Linked
- आधार केंद्रात जाऊन मोबाईल नंबर अपडेट करा.
4. Fingerprint Not Match
- हात कोरडे करून स्कॅन करा.
- वेगळ्या बोटाचा ठसा वापरून पहा.
- बायोमेट्रिक मशीन व्यवस्थित कार्यरत आहे का ते तपासा.
5. Name Mismatch
- अर्जातील नाव आणि आधारवरील नाव एकसारखे करून घ्या.
6. DOB Mismatch
- जन्मतारीख सुधारण्यासाठी UIDAI कडे अर्ज करा.
8. Pending for Verification
- 7-15 दिवस प्रतीक्षा करा.
- CSC सेंटरशी संपर्क करा.
9. Invalid Captcha Error
- Refresh करून कॅप्चा पुन्हा टाका.
10. Bank Account Not Linked
- जवळच्या बँकेत जाऊन आधार-खाते लिंक करून घ्या.
Step-by-Step प्रक्रिया – Ladaki Bahin Yojana E-Kyc Online
- अधिकृत पोर्टलला भेट द्या 👉 ladakibahin.maharashtra.gov.in
- “E-KYC” पर्याय निवडा.
- आधार क्रमांक टाका.
- OTP किंवा बायोमेट्रिक पद्धती निवडा.
- जातीचा प्रवर्ग निवडा:
- आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (category निवडायचा आहे, त्यामध्ये SC, ST, OBC, VJ (A), NT (B), NT (C), NT (D), SBC किंवा Open/General असे दिसेल त्यामधील तुमच्या जातीचा प्रवर्ग निवडा.
- माहितीची पडताळणी करा
- नंतर तुम्हाला दोन प्रश्न दिसतील
- पहिला प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत.” या प्रश्नासाठी तुम्हाला ‘होय’ YES हा पर्याय निवडायचा आहे .
- दुसरा प्रश्न आहे: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” हे एक डिक्लेरेशन Declaration आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा ‘होय’ YES निवडायचे आहे.
- दोन्ही ठिकाण ‘होय’ YES निवडल्यानंतर, दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल, यावर टिक करून “सबमिट करा” Submit या बटणावर क्लिक करा.
- सर्व माहिती पडताळा.
- अर्ज सबमिट करा व acknowledgment घ्या.
E-Kyc प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे माहिती दिसेल

Ladaki Bahin Yojana E-Kyc Error – टाळावयाच्या चुका
- चुकीचा मोबाईल नंबर वापरणे.
- Internet Explorer वापरणे.
- चुकीचा जातीचा प्रवर्ग निवडणे.
- आधार व अर्जातील नाव/जन्मतारीख वेगवेगळी असणे.
महत्वाच्या सूचना
- नेहमी अधिकृत पोर्टलचाच वापर करा.
- स्थिर इंटरनेट वापरा.
- संगणकावर प्रक्रिया करणे अधिक सोयीस्कर.
- अर्जातील माहिती आधारशी जुळली पाहिजे.
Helpline Numbers & संपर्क
- महाराष्ट्र शासन हेल्पलाइन: 1800-120-8040
- UIDAI आधार हेल्पलाइन: 1947
- CSC सेंटर संपर्क: जवळच्या ग्रामसेवक कार्यालयात सर्व प्रक्रिया मोफत.
- शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
निष्कर्ष
Ladaki Bahin Yojana E-Kyc Error ही एक सामान्य समस्या आहे. योग्य माहिती, स्थिर इंटरनेट आणि आधार तपशील अद्ययावत असल्यास ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होते.
1 thought on “How to Solve Ladaki Bahin Yojana E-Kyc Error | लाडकी बहीण योजना ई-केवायसी समस्या आणि उपाय”